तालचार | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिसा येथील विमानतळ, खत निर्मितीच्या कारखान्याच्या पुनर्विकास कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. आश्चर्य म्हणजे यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर फार टीका न करता ओडिसाचे मुख्यमंत्री नविन पटनायक यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी अप्रत्यक्षरीत्या पुढील काळात ओडिसामध्ये भाजप बीजेडी एकमेकांच्या विरोधात असणार असल्याचे संकेत दिले आहेत.
When BJP govt came to power in the centre, the work on fertiliser plants picked up speed. I ensure you that the construction of Talcher Fertiliser Plant will be completed in 36 months & I'll again come here to inaugurate it: PM Modi at a public rally in Talcher. #Odisha pic.twitter.com/Ja70Uqg42j
— ANI (@ANI) September 22, 2018
तालचर येथे रासायनिक खतांच्या कारखान्याच्या इमारतीच्या बांधकामाच्या उद्धाटनप्रसंगी बोलत होते. खत निर्मितीच्या कारखान्यातून पुढील ३६ महिन्यांत उत्पादन सुरु होईल आणि मीच उद्घाटनाला येईन, असे म्हणून २०१९ लाही आपण पंतप्रधान होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आहे.
आधीच्या सरकारकडून भीतीपोटी निर्णय घेतला गेला नाही
‘या आधीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाने फक्त स्वप्न दाखवली. पण ती स्वप्ने भाजप सरकारने प्रत्यक्षात आणली आहेत,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तीनच दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणारा अध्यादेश मंजूर केला आहे. कित्येक वर्षांपासून प्रलंबित निर्णय अखेर घेतला गेला आहे. पण पूर्वीच्या सरकारकडून केवळ मते गमावण्याच्या भितीपोटी हा निर्णय घेतला जात नव्हता, अशी टीका मोदींनी केली.
चार वर्षांतील योजनांचा उल्लेख
सरकारने गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात बँकीग क्षेत्राला ग्रामीण भागाशी जोडण्याचे सातत्याने प्रयत्न केले आहेत. ‘जनधन योजने’ च्या माध्यमातून ओडिसातील एक कोटी ३० लाख लोकांची बँकेत खाती उघडण्यात आली आहेत, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले. सरकारी योजनांचा लाभ, विविध योजनांचे पैसे थेट लाभधारकाच्या खात्यावर जमा होतात. पूर्वी एक रुपयातील १५ पैसे लोकांना मिळायचे आता संपूर्ण रक्कम मिळते, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.