HW News Marathi
देश / विदेश

मुंबई विमानतळाने रचला नवा विक्रम, २४ तासांत १००७ विमानांची उड्डाणे

मुंबई | मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने आपला स्वतः चाच आधीचा विक्रम मोडीत काढत शनिवारी (८ डिसेंबर) २४ तासांमध्ये तब्बल १००७ विमान उड्डाणाचा नवीन विक्रम रचला आहे. मुंबई विमानतळाने या आधी ५ जून २०१८ रोजी २४ तासांमध्ये १००३ विमान उड्डाणांचा विक्रम केला होता. मुंबई विमानतळ हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असून याला दोन धावपट्ट्या आहेत. मात्र, या दोन्ही धावपट्ट्या एकमेकांना छेदत असल्यामुळे एकावेळी एकच विमान उड्डाण करू शकते.

विशेष म्हणजे, भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानी हिच्या राजस्थानमधील उदयपूरमधील प्री-वेडींग सोहळ्याचा या विक्रमास मोठा हातभार लागल्याचे म्हटले जात आहे. ईशा अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांसह राजकीय नेते आपल्या खाजगी जेट्समधून रवाना झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकार नाही तर भ्रष्ठाचाराला संरक्षण देणारं सरकार !

News Desk

शेतकऱ्यांचा अंत न पाहता शेतकऱ्यांशी संवाद साधायला हवा-  रोहित पवार

News Desk

देशातील सर्वात जास्त लांबीच्या पुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार उदघाटन

News Desk