HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशासमोर आणखी एक संकट!

नवी दिल्ली | देशात कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील अनेक जिल्ह्यांत कोरोनाची स्थिती चिंताजनक झाली आहे. महाराष्ट्रात देखील अत्यंत कठीण परिस्थितीला सरकारला, सामान्य जनतेला, आरोग्य यंत्रणेला सामोरे जावे लागत आहे. या सगळ्या मुद्द्यावर आज (२० एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. मोदींनी बोलायला सुरुवात करण्याआधी जी लोकं या कोरोना महामारीत मारले गेले त्या सगळ्यांना आदरांजली वाहिली. इतकचं नाही तर, डॉक्टर, नर्स, सगळे आरोग्य कर्मी, पोलीस या सगळ्यांनी कोरोना काळात जी कामगिरी केली त्याचे कौतुक केले.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठे संकट उभे राहिले आहे. देशात ऑक्सीजनची कमतरता आहे. त्यासाठी केंद्र सरकार सर्वतोरी प्रयत्न करत आहे. ऑक्सिजनच्या या तुटवड्यावर सगळीकडे प्रयत्न सूरू आहेत की कशा प्रकारे यातून आपण बाहेर पडू शकू. यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू असल्याचे मोदींनी सांगीतले आहे. देशात जेव्हा तुरळक रूग्ण आढळले तेव्हाच vaccine तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या प्रतिकारासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग सज्ज

News Desk

स्वातंत्र्य दिन : पंतप्रधान म्हणाले, “देश म्हणून पुन्हा उभा राहण्याची वेळ आली आहे”

News Desk

कोल्हापुरातील शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना कोरोनाची लागण

News Desk