HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्रासह तीन राज्यात नीट परिक्षेचा गोंधळ

मुंबई : राष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट परिक्षा रविवारी पार पडली. यावेळी देशातल्या विविध राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या परिक्षे दरम्यान चार राज्यांच्या परिक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याचे चित्र पहायला मिळाले. अनेक ठिकाणी या परिक्षेचे पेपर चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्यामुळे परिक्षा एक ते दिड तास उशीरा सुरु झाली. या प्रकरणी केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाने परीक्षा उशीरा सुरु झाल्याटी कबुली रात्री उशीरा दिली.

या परिक्षेदरम्यान गोंधळ झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्रासह आसाम, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात बुलडाणा येथील एका परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ झाला होता. तर त्यानंतर मुंबईसह राज्यात सर्वच ठिकाणी ही परीक्षा सुरळीत झाल्याचे सीबीएसईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ही परीक्षा देशातील १३६ शहरांमध्ये असलेल्या २ हजार २५५ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती. त्यापैकी राज्यात ८९ परीक्षा केंद्रांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये, यासाठी सीबीएसईकडून सुमारे १.३३ कोटी संदेश परीक्षा आणि त्यापूर्वीच्या कालावधीदरम्यान पाठविण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“योग दिवसाच्या आड आजचा लपण्याचा दिवस नाही”, राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

News Desk

राजस्थानमधील अजमेर, अलवर आणि माडंलगड येथे फेरनिवडणुका

swarit

कोणत्याही गोष्टीवर उडपटांग बोलणं म्हणजे संशोधन नाही, राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

News Desk