नवी दिल्ली | बाबरी मशीद प्रकरणात लखनऊतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज (३० सप्टेंबर) निकाल दिला आहे.या प्रकरणात ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच,बाबरी मशीद पाडण्याची घटना हा पूर्वनियोजित कट नव्हता, असे निरीक्षण देखील नोंदवले आहे. न्यायालयाच्या निकालानंतर AIMIMचे नेते ओवेसी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जर मशीद ३२ जणांनी पाडली नाही, तर कुणी पाडली?, असा सवाल ओवेसी उपस्थित केला आहे.सीबीआय न्यायालयानं दिलेला निकाल न्यायालयाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. ६ डिसेंबरला बाबरी मशीद जादूनं पाडण्यात आली होती का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
Today is a sad day in the history of Indian judiciary. Now, the court says there was no conspiracy. Please enlighten me, how many days of months of preparations are required to disqualify an action from being spontaneous?: Asaduddin Owaisi, on the #BabriMasjidDemolitionVerdict pic.twitter.com/iMumkda50l
— ANI (@ANI) September 30, 2020
“२८ व २९ डिसेंबरच्या रात्री त्या ठिकाणी जादू करून मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या का? राजीव गांधी पंतप्रधान असताना जादूनं कुलूप उघडण्यात आलं होतं का? त्यामुळेच मी म्हणतोय की, सर्वोच्च न्यायालयानं जे म्हटलं होतं, त्याच्याविरोधात हा निकाल आला आहे. जर तुम्ही हिंसा कराल, तर तुम्हाला मिळून जाईल, असं यातून दिसतं. अडवाणींची रथयात्रा भारतात जिथे कुठे गेली, तिथे हिंसा झाली. लोकांच्या हत्या झाल्या. संपत्ती जाळण्यात आली. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि आज न्यायालयाचा निकाल येतो की ती घटना स्वयंस्फूर्त नव्हती. मग आम्ही विचारतो की, मग स्वयंस्फूर्त असण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो,” असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला.
” एक धक्का और दो, बाबरी मशीद तोड दो, असं उमा भारती म्हणाल्या होत्या, ही गोष्ट खरी नाही का की? बाबरी मशीद पाडली जात असताना मिठाई वाटली जात होती, हे जगानं पाहिलं नाही का? सीबीआयच्या आरोपपत्रात हे म्हटलेलं आहे की, ५ डिसेंबरच्या रात्री आडवणींनी विनय कटियार यांच्या घरात कट रचला. हे खरं नाही का? ,” असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.