HW News Marathi
देश / विदेश

पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली | दिल्ली उच्च न्यायालयाने आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांची अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात चिदंबरम सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. चिदंबरम यांना आयएनएक्स घोटाळ्या प्रकरणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन देण्यास ईडी आणि सीबीआयने विरोध दर्शवला होता. चिदंबरम हे चौकशीला सहकार्य करत नसून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करणे गरजेचे आहे, अशी बाजू ईडी आणि सीबीआयने न्यायालयात मांडली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ ऑगस्टला होणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

नमके काय आहे प्रकरण

चिदंबरम हे अर्थमंत्री असतानाच्या काळात आयएनएक्स मीडीयामध्ये विदेशातून ३०५ कोटी रुपयांचा निधी गुंतवण्यात आला होता. याबाबतच्या प्रस्तावाला चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखालील एफआयपीबीने मंजुरी दिली होती. चिदंबरम यांच्या पुत्राच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ताब्यात असलेल्या कंपन्यांद्वारे विदेशातून हा निधी भारतात आणण्यात आला असल्याचा दावा तपास सीबीआयनी केला आहे. आयएनएक्स मीडीया घोटाळ्याप्रकरणी दिल्‍ली उच्च न्यायालयाने २५ जुलै २०१८ रोजी चिदंबरम यांना अंतरीम जामीन दिला होता. त्यानंतर वारंवार त्यांना न्यायालयाने दिलासा दिलेला आहे. मात्र, यावेळी न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लखीमपूर हिंसाचाराचा व्हिडीओ ट्वीट करणाऱ्या वरुण गांधींबाबत भाजपाचा मोठा निर्णय

News Desk

Republic Day | जाणून घ्या…“ऐ मेरे वतन के लोगो…” या हृदयस्पर्शी गीताचा इतिहास

News Desk

अमेरिकेतील विमानतळावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा अपमान

News Desk