नवी दिल्ली | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय वायुसेनेचा पायलट त्यांच्या ताब्यात असल्याची कबुली दिली आहे. इम्रान यांनी आज (२७ फेब्रुवारी) पत्रकार परिषदत घेऊन यांची माहिती भारताला दिली आहे.भारताच्या वायुसेने हद्दीमध्ये पाकिस्तानी लढाऊ विमान शिरल्याची महत्त्वाची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली होती. नौशेरा सेक्ट्रमधील राजौरी येथे पाकिस्तानी विमानाने घुसखोरी केल्याची माहिती पीटीआय या वृत्त संस्थेने दिली होती.
Pakistan Prime Minister Imran Khan: If a war takes place, it will not be in my or Narendra Modi's control. If you want any kind of talks on terrorism, we are ready. Better sense must prevail. We should sit down & talk pic.twitter.com/XydmNgLYYC
— ANI (@ANI) February 27, 2019
“एकदा युद्ध झाले तर माझ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या हातात नियंत्रण राहणार नसल्याचे इम्रान यांनी म्हटले आहे. दहशतवादाविरोधात आम्ही संवाद साधण्यासाठी तयार असल्याचे इम्रान म्हणाले आहे. “इतिहास साक्ष आहे की, जेव्हा युद्ध होते ते कधी कधी संपते हे सांगता येत नाही.”
Pakistan PM Imran Khan: All wars in world history have been miscalculated, those who started the wars did not know where it will end. So, I want to ask India, with the weapons you and we have, can we afford miscalculation? pic.twitter.com/3wnmLYq39P
— ANI (@ANI) February 27, 2019
काहीच वेळापूर्वी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी वायू दलाच्या घुसखोरी केल्याची अधिकृत माहिती दिली आहे. “भारतीय वायू दलाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले मात्र वायू दलाचे एक विमान अद्याप परतले नसून भारतीय दलाचा एक पायलट देखील परतलेला नाही”, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी यावेळी दिली आहे. अखेर पाकिस्ताने भारतीय वायुदलाचे पायलट आमच्याकडे असल्याची कबुली दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.