नवी दिल्ली | गुजरातमधील कच्छ सीमेवर भारतीय सुरक्षा दलाला पाकिस्तानी ड्रोन आढळले असून भारतीय सुरक्षा दलांकडून हे ड्रोन पाडण्यात आले आहेत. हे पाकिस्तानी ड्रोन भारतीय हद्दीत आढळले होते. भारतीय वायू दलाच्या ‘मिराज २०००’ या १२ लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषा पार करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये (एलओसी) असणाऱ्या दहशवाद्यांच्या तळावर मंगळवारी (२६ नोव्हेंबर) पहाटे ३.३० च्या सुमारास तब्बल १००० किलो बॉम्ब टाकले असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. भारतीय सैन्याकडून अवघ्या २० मिनिटांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
Indian Army shot down a Pakistani drone last night in Kutch area of Gujarat, bordering Pakistan
Read @ANI story | https://t.co/Ybk6ROaI1I pic.twitter.com/S8bgZ5rCRo— ANI Digital (@ani_digital) February 26, 2019
परराष्ट्र मंत्रालयाकडून देखील आता या कारवाईला अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. या हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या ‘बालाकोट’ या दहशतवादी तळातील २०० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाला असल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून मिळत आहे. पाकिस्तानकडून मात्र हे सर्व अमान्य केले जात असून भारतीय हवाई दलाच्या विमानाने नियंत्रण रेषा ओलांडली मात्र आम्ही त्यांना थारा दिला नाही, असा बनावटी दावा केला जात आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.