HW News Marathi
देश / विदेश

पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक करण्याची मुदत सप्टेंबरपर्यंत वाढली

नवी दिल्ली । पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर लिंक करण्याच्या मुदतीत सीबीडीटीकडून वाढविण्यात आली आहे. पॅनला आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवल्याची माहिती सीबीडीटीने दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ मार्च २०१९ पर्यंत पॅन कार्डआधार कार्डला लिंक करण्याची तारीख वाढवली असल्याचे सांगितले आहे. परंतु ती मुदत वाढ केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डा(सीबीडीटी)ने वाढवली आहे. त्यामुळे आता ३० सप्टेंबर २०१९पर्यंत आपल्याला पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करता येणार आहे.

तसेच १ एप्रिलपासून उत्पन्नाचा परतावा भरताना आधार क्रमांक देणे आणि लिंक करणे बंधनकारक असल्याचंही सीबीडीटीने स्पष्ट केलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ‘आधार’सक्तीच्या मुदतीत वाढ करण्याचे निर्देश केंद्रीय थेट कर मंडळाकडून (सीबीडीटी)जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार आयकर भरताना आधार कार्ड नंबर देणे सक्तीचे असेल. केंद्र सरकारने बोगस पॅन कार्डद्वारे होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी आधार-पॅन जोडण्याचा कायदा अंमलात आणला होता.

पॅन-आधार जोडणीस आतापर्यंत सहावेळा मुदतवाढ मिळाली आहे. यापूर्वी ३० जून २०१८ला ही मुदत संपली होती. मात्र त्यानंतर ही मुदत ३१ मार्च २०१९पर्यंत वाढवण्यात आली. आधार क्रमांकाशी जोडणी न केलेले पॅन अवैध ठरू शकतील, अशी चुकीची माहिती पसरल्याने या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आल्याचे सीबीडीटीने सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

OBC Reservation | निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रस्तावाला कॅबिनटमध्ये मंजुरी

News Desk

अभिमानास्पद ! विदर्भाचा माणुस थेट स्कॅाटिश संसदेत झाला खासदार

News Desk

गृहमंत्र्यांलयाकडून अमरनाथ यात्रेकरू, पर्यटकांना काश्मीर सोडण्याचे आदेश

News Desk