मुंबई | देशात अनलॉक १ सुरू झाल्यापासून नागरिकांचा निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा चिंतेचा विषय ठरत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले. आता आपण अनलॉक २ मध्ये प्रवेश करणार आहोत, असे ही मोदींनी देशातील जनतेला आज (३० जून) संबोधिक करताना सांगितले. मोदी पुढे म्हणाले, प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेचा विस्तार करण्यात आला असून नोव्हेंबरपर्यंत ही योजना सुरु राहणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या विस्तारात ९० हजार कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे.
Under PM Gareeb Kalyan Anna Yojana, Government will provide free ration to 80 crore poor brothers-sisters for next five months. Every member of the family will get 5 kg wheat or rice. Also, every family will get one kilogram whole chana per month, free of cost: PM Modi pic.twitter.com/sSOx5bnozK
— ANI (@ANI) June 30, 2020
दरम्यान, देशात लॉकडाऊनच्या काळात गेल्या तीन महिन्यांत जन धन खात्यांत ३१ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. तसेच गेल्या ३ महिन्यात २० कोटी गरिबांच्या खात्या ३१ हजार कोटी जमा करण्यात आले आहेत. पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजने अंतर्गत देशातील ८० कोटी नागरिकांना ५ किलो गहू किंवा तांदूळ आणइ एक किलो चना डाळ आणखी ५ महिने मोफत मिळणार आहे.
मोदींच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे
- गेल्या तीन महिन्यांत जन धन खात्यांत ३१ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले.
- गेल्या ३ महिन्यात २० कोटी गरिबांच्या खात्या ३१ हजार कोटी जमा करण्यात आले आहेत.
- गेल्या तीन महिन्यात देशात एकही गरीब उपाशी पोटी झोपलेला नाही
- या योजनेंतर्गत गरिबांना पावणे दोन लाख कोटींचे पॅकेज दिले गेले.
- लॉकडाऊनच्या संकटाशी निपटण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजना लागू करण्यात आली.
- तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलंच असेल की एका देशाच्या पंतप्रधानांवर १३ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला कारण त्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान केले नव्हते
- पंतप्रधान असो वा कोणी सर्वांनी नियमाचे पालन करणे गरजेचे आहे
- लोकांना काटेकोपरणे नियमाचे पालन होणे गरजेचे
- जे नागरिक लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करत नाहीत त्यांना थांबवायला हवं, समजवायला हवं.
- लॉकडाऊनमध्ये हात धुणे, मास्कचा वापर करण्याबद्दल सर्तक होते तसेच आता पण गरजेचे आहे
- अनलॉक १ सुरू झाल्यापासून बेजबादारपणा वाढला
- योग्य वेळीच लॉकडाऊन केल्याने लाखो लोकांचे जीव वाचविले आहे
- आपण अशा ऋतूत प्रवेश करत आहोत जिथे सर्दी, खोकला आणि ताप सहजच पसरतो. त्यामुळे सर्व देशवासियांकडे प्रार्थना करतो की, अशावेळी आपली काळजी घ्या, असे आवाहन मोदींनी केले
- कोरोनाच्या संकटाशी लढता लढता आता आपण अनलॉक २ मध्ये प्रवेश करत आहोत
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.