HW News Marathi
देश / विदेश

तीन वर्षात सरकारवर कुठलाही डाग नाही – पंतप्रधान मोदी

वॉशिंग्टन – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच्याच सरकारवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. तीन वर्षांच्या कार्यकाळात माझ्या सरकारवर कुठलाही डाग लागला नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्याचबरोबर त्यांनी नोटाबंदी आणि भ्रष्टाचारासंदर्भात केंद्र सरकानं केलेल्या उपाययोजनांचंही समर्थन केलंय. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरच लोकांनी आपल्याला निवडून दिल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं. भारतीय भ्रष्टाचाराचा तिरस्कार करतात, असंही मोदी यावेळी म्हणाले.

भारत आणि अमेरिकन नागरिकांच्या संयुक्त विद्यमानं वाशिंग्टन इथं आयोजित एका कार्यक्रमात मोदी बोलत होते. भारताला विविध क्षेत्रामध्ये उंचीवर नेण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध असून गेल्या तीन वर्षांमध्ये आपल्या सरकारनं जी कामगिरी केली त्यापार्श्वभूमीवर सरकारवर कुठलाही डाग लागलेला नसल्याचं ते म्हणाले. तंत्रज्ञानाचा वापर करून कामकाजात पारदर्शकता आणून देशाला विविध क्षेत्रात उंचीवर नेण्याचं काम करत असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ICSE आणि ISC परिक्षांचा निकाल उद्या जाहीर होणार!

Jui Jadhav

#PulwamaAttack : गृहमंत्री राजनाथ सिंह श्रीनगरमध्ये दाखल

News Desk

नन बलात्कार प्रकरणातील आरोपीला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

swarit