HW News Marathi
देश / विदेश

गौरी लंकेश हत्या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले

बंगळुरू जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी ठिकठीकाणी नाकाबंदी केली आहे. याप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी एका संशीयताला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी पोलिस करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शहरातील प्रत्येक चौकात पोलीस चेकपोस्ट उभ्या करण्यात आले असून टोल नाक्यावर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आले आहे. बंगळुरू शहरात येणा-या जाणा-यांवर पोलिसांनी ठेवून आहेत.

लंकेश यांचे निवासस्थान आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची तपासणी केली जात आहे. त्यांच्या घरातही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र, पासवर्ड असल्याने पोलिसांना अद्याप सीसीटीव्ही फुटेज मिळू शकले नाहीत. तज्ज्ञांच्या मदतीने फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे

हेही वाचा ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या

गौरी लंकेश यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि कलबुर्गीनंतर लंकेश यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. बंगळुरू पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत लंकेश यांच्या हत्येच्या घटनेनंतर त्यानं सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टच्या आधारावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. संदीप असं या तरुणाचं नाव असून त्याचा आणि हल्लेखोरांचा नक्कीच काहीतरी संबंध आहे, असा पोलिसांना संशय आहे. त्या अनुषंगाने पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्य निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा राजीनामा

News Desk

मध्य रेल्वेने भंगार महसूलातून कमावले तब्बल 220 कोटी

Manasi Devkar

माजी मुख्यमंत्री एनडी तिवारींचा मुलगा रोहित शेखर यांचा मृत्यू

News Desk