नवी दिल्ली | दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फडले जातात. यामुळे वातावरणात ध्वनी आणि हवेचे प्रदूषण होते. हे प्रदूषण मानवी शरीरासाठी धोकायदायक आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फडविण्यासाठी रात्री आठ ते दहा या कलावाधीतच फटाके फोडण्याचे बंधन घालण्यात आले होते. परंतु न्यायालयाच्या या आदेशाचे देशातीलने राज्यात उल्लंघन झाल्याचे चित्र दिसून आले. न्यायालयाने ठरविलेल्या वेळेत फटाके न फोडल्याने मुंबई आणि दिल्ली एकूण ३०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून मुंबईत या आंतर्गत ८ जणांना अटक देखील करण्यात आले.
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पहाटे आणि रात्री १० वाजेनंतर फटाके फडणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश देताच ठाणेदारांनी १३६ जणांविरुद्ध भा.दं.वि. कलम १८८, १९० आणि १९१ नुसार गुन्हे दाखल केले. नागपुरात ६४ फटाकेबाजांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तर मुंबई-ठाण्यात पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून शंभराहून अधिकव्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत. अनेकांकडून दंड वसूल करण्यात आहे. परंतु फटाके वाजवल्याबद्दल कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात एकही गुन्हा नोंद झालेला नाही. अकोला पोलिसांनी मात्र एकही गुन्हा दाखल आला नसून वरिष्ठ स्तरावरून परिपत्रक न आल्याचे सांगून कारवाईस टाळाटाळ केल्याचे चित्र दिसून आले.