HW News Marathi
राजकारण

दिवाळीत फटाके फोडून प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई

ठाणे | दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडून साजरी केली जाते. परंतु फटाके फोडल्याने वातावरणात ध्वनी आणि हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढ होते. या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासाठी ठराविक वेळ ठरविण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशाचे पालन न केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ध्वनी आणि वायु प्रदूषणाचे ठाण्यातील चितळसर आणि कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर कल्याणमधील मानपाडा पोलीस ठाण्यात ८, विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये ६ आणि ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये ५ अशा एकूण १९ जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३३ (आर) १३१ प्रमाणे करवाई केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

…अन् रणजितसिंहांनी केला घड्याळाचा प्रचार

News Desk

ठाकरे-आंबेडकरांमध्ये दीड तास बैठक; आगामी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा ?

Aprna

पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू, यवतमाळमध्ये ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड

swarit
राजकारण

सारंग यांच्या निधनाने मराठी रंगभूमी-चित्रपट क्षेत्राची मोठी हानी | विनोद तावडे

News Desk

मुंबई | ‘सखाराम बाईंडर’, ‘कमला’, ‘रथचक्र’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार नाटकांमध्ये आणि ‘सामना’, ‘हा खेळ सावल्यांचा’ सारख्या चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भुमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या निधनाने मराठी रंगभूमी – चित्रपट क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ट्विट करून लालन सारंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

शोकसंदेशात तावडे यांनी म्हटले आहे की, विजय तेंडुलकर लिखित सखाराम बाईंडर, कमला या गाजलेल्या नाटकांमधून कमला आणि चंपा या दोन व्यक्तिरेखा अत्यंत धाडसाने साकारणाऱ्या लालन सारंग यांनी रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा जबरदस्त ठसा उमटवला. त्याचबरोबर मराठी आणि हिंदी नाटकांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे. मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी लक्षवेधी भुमिका साकारल्या आहे. कणकवली येथे झालेल्या ८७ व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवले होते. आपल्या दर्जेदार अभिनयाने मराठी रंगभूमीला समृद्ध करणाऱ्या लालन सारंग यांच्या निधनामुळे रंगभूमीने अष्टपैलू व्यक्तिमत्व गमावले आहे, असेही तावडे यांनी शेवटी म्हटले आहे.

Related posts

अहमदनगरच्या जागेसाठी राहुल गांधी मध्यस्थी करणार ?

News Desk

संभाजीनगर नव्हे ‘छत्रपती संभाजीनगर’; औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामकरणास शिंदेंची मान्यता

Manasi Devkar

एक्झिट पोलच्या माध्यमातून हजारो ईव्हीएम्समध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न !

News Desk