नवी दिल्ली | दहशतवादाच्या मुद्यावर आता शांत बसणार नाही, यापुढे आम्ही कोणतेही नुकसान देखील सहन करणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारने उरी आणि पुलवामा हल्ल्याच्या विरोधात दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलेली असल्याचे यावेळी मोदींनी सांगितले. ‘सीआयएसएफ’च्या ५० व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते.
PM at CISF's 50th Raising Day in Ghaziabad: Your achievement is imp bcos when neighbour is hostile, incapable to fight war, conspiracies to hit the nation internally find a safe haven there&terrorism shows its face in different forms then protecting the nation becomes challenging pic.twitter.com/msgBFUp7qg
— ANI (@ANI) March 10, 2019
गाझियाबादमध्ये सीआयएसएफच्या कँपमध्ये जवानांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी तुमच्या हातात प्रवाशांची सुरक्षा आहे. तुमच्या हातात देशातील औद्योगिक प्रतिष्ठान आहेत. कोणत्याही व्हीआयपीला सुरक्षा देण्यापेक्षाही तुमचे काम मोठे आहे. तुम्ही तुमचे काम किती नम्रपणे करतात याचा मी साक्षीदार आहे. पंतप्रधान मोदी यांनी सीआयएसएफने मानवतेच्या दृष्टीकोनातून तसेच शांती काळात घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले.
Prime Minister Narendra Modi attends the 50th Raising Day of Central Industrial Security Force in Ghaziabad. pic.twitter.com/tpfXYdnBxx
— ANI (@ANI) March 10, 2019
या कार्यक्रमात मोदींनी सीआयएसएफ देश आणि औद्योगिक प्रतिष्ठानांच्या सुरक्षेचा आधार असल्याचे सांगत मोदींनी कौतुक केले आहे. वैभवशाली भारताच्या निर्मितीमध्ये आपले योगदान महत्वाचे असल्याचे म्हटले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी सीआयएसएफचा गणवेश परिधान करणार्या मुलींची संख्या अधिक असून, या मुलींसोबतचे मी त्यांच्या आईचेही अभिनंदन करतो असेही ते म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.