HW Marathi
Covid-19 देश / विदेश राजकारण

पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार, नक्की काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहेत.  मोदी आज (३० जून) सायंकाळी ४ वाजता देशवासियांना बोधित करतील. मात्र, मोदी आज बोलताना कोणत्या विषयावर जनतेला संबोधित करणार, हे समजलेले नाही. मोदी हे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. तर  दुसरीकडे भारत-चीनमध्ये वाढता तणाव,  अनलॉक-2 ची अधिकृत घोषणा आदी विविध मुद्यावर देशाल संबोधित करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आज संध्याकाळी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत, असे पीएमओ इंडियाच्या ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट मोदींनी काल (२९ जून) ट्वीट केले. तसेच भारत-चीन सीमारेषा भागात तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून चीनच्या  ५९  अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राउजर यांसारख्या अनेक मोठ्या आणि लोकप्रिय चिनी अॅप्सचा समावेश आहे. आयटी अॅक्ट २००० अंतर्गत या अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.

 

 

Related posts

मोदी दर दोन-तीन दिवसांआड महाराष्ट्रात येत आहेत, राजकीय हवा बदलत आहे !

News Desk

माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी केली विखेंची पाठराखण

Gauri Tilekar

दहशतवाद्यांनी केले काश्मीरमधील पोलिसांच्या नातेवाईकांचे अपहरण

अपर्णा गोतपागर