HW News Marathi
देश / विदेश

अखेर राहुल गांधींनी सांगितलं मोदींची गळाभेट घेण्याचं कारण

हॅमबर्ग | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जर्मनीतील हॅमबर्ग येथील बुसेरियस समर स्कुलमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी मोदींची गळाभेट आपण नेमकी का घेतली हे सांगताना ते म्हणाले,” ही भारताची ओळख आहे. तिरस्काराचे उत्तर प्रेमाने देण्याचा तो माझा प्रयत्न होता. मोदी कायमच माझ्यावर द्वेषाने टीका करतात. द्वेष ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. म्हणून मी त्यांना हे जग द्वेषाने नव्हे तर प्रमाणे चालते हे सांगण्याचा प्रयत्न केला. मोदींची गळाभेट घेणं काँग्रेसमधील अनेक जणांना रुचले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पण तिरस्काराला तिरस्काराने उत्तर देणं हे मूर्खपणाचं असतं, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

राहुल यांच्या संवादातील काही महत्त्वाचे मुद्दे :

  • माझी आजी आणि वडील यांची या दोघांचीही हत्या केली गेली. त्यामुळे हिंसा किती भीषण असते हे मला माहित आहे.
  • देशातील बेरोजगारी,अचानक आणलेली नोटबंदी आणि जीएसटी यामुळेच जमावाकडून होणारा हिंसाचार वाढला आहे, असे म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली. बेरोजगारीमुळे असलेला राग आणि लहान व्यवसायांचे होत असलेले प्रचंड नुकसान यामुळेच अशा हिंसक घेताना वाढीस लागल्या आहेत, असे हे म्हणले.
  • ह्या २१ शतकात जर तुम्ही लोकांना योग्य दृष्टी दिली नाही तर दुसरा कुणीतरी ती दृष्टी देईल. त्याचे विचार कदाचित तुम्हाला पटणार नाहीत पण अखेर तुम्हाला त्याचेच ऐकावे लागेल.
  • आदिवासी, दलित अल्पसंख्याकांना विकासाच्या प्रक्रियेतून वगळल्याचा आरोप राहुल गांधींनी मोदी सरकारवर केला. तुम्ही समाजातील एका मोठ्या घटकाला विकासाच्या प्रक्रियेतून वगळू शकत नाही, असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या

राहुल गांधींनी घेतली मोदींची गळाभेट

राहुल गांधी यांनी कुणाला मारला डोळा…. जाणून घ्या

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ प्रदान

Aprna

निवडणुका अधिक सर्वसमावेशक बनवण्यासाठी ७५% मतदानाचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

News Desk

आम्ही फक्त तीनच राजांना मानतो ! प्रकाश आंबेडकरांचे नवे विधान

News Desk