HW News Marathi
देश / विदेश

मोदीजी…..आज जुमलों की बारीश, राहुल गांधीचा मोदींना चिमटा

मुंबई – मोदींचे होम ग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये निवडणूकी पूर्वीच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चांगलच वातावरण तापवलं आहे. नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये एका सभेला संबोधित करणार आहेत. या सभेची राहुल गांधी यांनी खिल्ली उडवत मोदीजी आजच्या सभेत गुजरातवासींयावर जुमलों की बारीश करतील असा टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी या बाबत ट्विट करत मोदींना छेडले आहे. आजच्या सभेत मोदी आश्वासनाचा पाऊस पाडतील असा टोला ही त्यांनी लगावला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं काढलेल्या ‘गुजरात गौरव यात्रे’चा आज समारोपाचा कार्यक्रम आहे.

या समारोप यात्रेला तब्बल ७ लाख कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. ही एक एेतिहासिक रेली होईल असेही भाजपकडून सांगितले जात आहे. गुजरातमध्ये राहुल गांधी यांनी मोदी विरोधात रान पेटवले आहे. त्याला या सभेच्या माध्यमातून मोदी काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांच्या राहुल गांधींना शुभेच्छा

News Desk

सुरक्षा दल-नक्षलवाद्यांमधील चकमकीत ७ नक्षली ठार

News Desk

राहुल गांधी आरएसएसच्या कार्यक्रमाला जाणार ?

swarit