नवी दिल्ली | काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये राजकीय हालचाली अनेक झाल्या. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याकडून उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पद काढून घेण्यात आले. मात्र, तूर्तास तरी राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री सचिन पायलट यांना न्यायालयानं दिलासा दिला आहे. सचिन पायलट यांच्या गटाला उच्च न्यायालयाने २४ जुलैपर्यंत दिलासा देत सभापती सी.पी.जोशी यांना कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.
माजी मुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या गटाने विधानसभेचे सभापती सी.पी.जोशी यांनी बजावलेल्या नोटिसीविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. राजस्थान उच्च न्यायालयात आज.(२१ जुलै) यावरील सुनावणी घेण्यात आली. दरम्यान, न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला असून २४ जुलैपर्यंत या आमदारांविरोधात कोणतीही कारवाई न करण्याचे आदेशही सभापतींना देण्यात आले आहेत.
Hearing has concluded. Rajashthan High Court has fixed 24th July as date for passing order. Hearing before Speaker also deferred by Court: Prateek Kasliwal, lawyer of Speaker CP Joshi https://t.co/FHqe9IjTf8 pic.twitter.com/x2rpHG9A3g
— ANI (@ANI) July 21, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.