HW News Marathi
देश / विदेश

“गुलाम नबी आझाद म्हणजे काश्मीरचा बिन काट्यांचा गुलाब”

मुंबई | कॉंग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांच्यासह आज (९ फेब्रुवारी) ४ खासदार राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या कार्याचा आढावा घेतानाच त्यांच्याशी असलेल्या व्यक्तिगत मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. नेहमी वादविवाद आणि गोंधळाचं चित्र दिसणाऱ्या राज्यसभेत आज यामुळेच वेगळंच वातावरण होतं. प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्या भावनिक छटा झळकत होत्या. निमित्त होतं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार सदस्यांच्या निरोपाचं. चार सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून, त्यांना निरोप देण्यात आला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही ‘काश्मीरचा बिन काट्यांचा गुलाब’ अशी उपमा देत कौतूक केलं आहे.

राज्यसभेतील कार्यकाळ संपलेल्या सदस्यांना निरोप देताना संजय राऊत यांनी मनोगत व्यक्त केलं. राऊत यांनी गुलाम नबी आझाद यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. राऊत म्हणाले,”गुलाम नबी आझाद म्हणजे काश्मीरचा बिन काट्यांचा गुलाब आहे. त्यांच्याविषयी बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यामुळे आम्हीही भावूक झालो. ज्यांच्यासोबत काम केलं. ती व्यक्ती आज सभागृहातून जात आहे. मला विश्वास आहे की, ते पुन्हा सभागृहात परत येतील. त्यांनी इंदिरा गांधीपासून ते मोदीजींपर्यंतचा काळ बघितला. त्यांनी इंदिरा गांधी ते मोदी असं पुस्तक लिहायला हवं. जेव्हा दिल्लीच्या राजकारणात मोठंमोठी माणसं होती. तेव्हा आझादांसारखी एक व्यक्ती गावातून येते आणि यशस्वी झाले,” असं राऊत म्हणाले आहेत.

“त्यांचं महाराष्ट्रासोबत त्यांचं फार जुनं नातं आहे. जसं की शरद पवारांनी सांगितलं की, त्यांनी वाशिम जिल्ह्यातून निवडणूक लढवली होती. निवडून आले होते. त्यामुळे तिथे आजही त्यांच्याविषयी बोललं जातं. ते मराठीतून बोलतात. मोदी जसं मराठीतून बोलतात. तसं आझादही बोलतात. काँग्रेसमध्ये नेत्यांची कमी नाही. पण, संपूर्ण देश जाणतो, असे आझादांसारखे नेते खूप कमी आहेत. मी आझाद यांना निरोप देत नाही. ते परत सभागृहात येईपर्यंत मी त्यांची वाट बघेन,’ अशा भावना राऊत यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने नागरिकांना भेट, ऑनलाईन तपासा सर्व तपशील

News Desk

#Article370Abolished : काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला जम्मू-काश्मीरमध्ये जाण्याची मिळाली परवानगी

News Desk

महाराष्ट्रातून कांदा निर्यातबंदीचे पडसाद उमटू लागल्यानंतर फडणवीसांचे गोयल यांना पत्र

News Desk