नवी दिल्ली | ज्येष्ठ पत्रकार आणि एच.डब्ल्यू. न्यूज नेटवर्कचे सल्लागार संपादक विनोद दुआ यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज (१४ जून) सुनावणी पार पडली आहे. यावेळी विनोद दुआ यांना पुढील सुनावणीपर्यंत अटक होणार नाही. या याचिकेवर ६ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. मात्र, न्यायालयाने विनोद दुआ यांच्या याचिकेवर हिमाचल प्रदेशमधील भाजपचा नेत्याला नोटीस पाठविली असून पुढील २ आठवड्यात जबाब नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे.
SC issues notice to Union of India, and the state of Himachal Pradesh and has sought a detailed reply on veteran journalist Vinod Dua's petition. SC gives 2 weeks notice to file responses; further hearing in the matter scheduled on July 6. https://t.co/3SSEka1U0G
— ANI (@ANI) June 14, 2020
सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले, “विनोद दुआ यांची पोलिसी चौकशी करण्यापूर्वी त्यांना २४ तास आधी नोटीस देण्यात यावी. तर विनोद दुआ यांच्या घरी जाऊन पोलीस चौकशी करावी. तसेच चौकशीदरम्यान विनोद दुआ यांना पोलिसांना सहकार्य करावे लागणार आहे”. हिमाचल प्रदेशमधील भाजपचा नेत्यांनी एच.डब्ल्यू. हिंदीसाठी ‘द विनोद दुआ शो’ करणाऱ्या विनोद दुआ यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे दुआ यांच्याविरोधात 124 A-Sedition, 268, 501 & 505 या कलमांतर्गत दाखल केली. या पार्श्वभूमीवर विनोद दुआ यांनी त्यांच्यावरील लावण्यात आलेले सर्व आरोप रद्द करण्याची मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली. या याचिकेवर आज विशेष सुनावणी पार पडली असून या याचिकेवर आज सकाळी ११ वाजता न्यायमूर्ती यू यू ललित, एम एम शांतनागौडर आणि विनीत सरन यांच्या खंडपीठासमोर सुनावणीला सुरुवात झाली.
यापूर्वी, दिल्ली भाजप प्रवक्ते नवीन कुमार यांनी विनोद दुआ यांच्याविरूद्ध ४ जूनला पहिली FIR दाखल केली होती. एच.डब्ल्यू. हिंदीसाठी ‘द विनोद दुआ शो’ या त्यांच्या शोमधल्या काही एपिसोडचा दाखला देत, ही पहिली FIR दाखल करण्यात आली होती. विशेषतः दिल्ली दंगल, ज्योतिरादित्य सिंधियांचा भाजप प्रवेश, व्यापम घोटाळा प्रकरणाशी संबंधित एपिसोडमुळे ही पहिली FIR दाखल करण्यात आली होती. त्यासंदर्भात दिल्ली साकेत न्यायालयाने विनोद दुआ यांना २९ जूनपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे. त्यानंतर, आता दुआ यांच्या विरोधात आणखी एक FIR दाखल करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्याविरोधात दुसरी FIR दाखल
सरकारला प्रश्न विचारल्यामूळे विनोद दुआ यांच्याविरूद्ध भाजप प्रवक्त्याकडून FIR दाखल
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.