HW News Marathi
देश / विदेश

४५३ कोटी जमा करा, अन्यथा ३ महिने शिक्षा भोगा | सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडचे अध्यक्ष अनिल अंबानींना जोरदार झटका दिला आहे. न्यायालयाने एरिक्सन इंडियाने केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान अनिल अंबानींसह दोन जणांना ४५३ कोटी रुपयांची रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत. दंडाची रक्कम एक महिन्यात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने सुनावले आहे. तिघांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा दंडही ठोठावला.

अनिल अंबानी यांच्यासह रिलायन्स टेलिकॉमचे अध्यक्ष सतीश सेठ आणि रिलायन्स इन्फ्राटेलचे अध्यक्ष छाया विरानी यांचा समावेश आहे. या याचिकेत एरिक्सन इंडियाने ५५० कोटी रुपये रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडकडे बाकी असल्याचे म्हटले होते. या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येईल असे न्यायालयाने म्हटले आहे.

या रकमेची रिलायन्स कम्युनिकेशनकडून पुर्तता न झाल्याने तसेच न्यायालयीन निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी एरिक्सन इंडियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर निर्णय देताना अंबानी यांना न्यायालयाने दणका दिला.

 

Related posts

मध्य प्रदेशचे राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन यांचे निधन

News Desk

पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत- सामना

News Desk

अर्थमंत्री अरुण जेटली यांना कॅन्सर, उपाचारासाठी न्यूयॉर्कला रवाना

News Desk