नवी दिल्ली | माजी केंद्रीय मंत्री आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेले आर. के धवन यांचे सोमवारी दिल्लीच्या एका रुग्णालयात निधन झाले. मृत्यू समयी ते ८१ वर्षांचे होते. सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीच्या बी. एल. रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
The passing away of Shri #RKDhawan ji, who I have known since childhood, leaves a deep void in the Congress family of which he was an important, senior member – loved, respected and admired by all. My condolences go out to his friends and his family in their time of grief.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 7, 2018
वाढत्या वयानुसार आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे त्यांना गुरुवारी दिल्लीच्या बी. एल. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तसेच कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी धवन यांच्या निधनानंतर ट्विटर द्वारे श्रद्धांजली वाहिली. तसेच काही आठवणी देखील शेअर केल्या आहे. माजी पंतप्रधान दिवंगत इंदीरा गांधी यांचे खाजगी सचिव म्हणून देखील आर. के. धवन यांनी काम पाहिले.
Our homage to veteran Congress leader, Sh. R.K.Dhawan, who breathed his last today. His tireless spirit, immeasurable commitment & untiring dedication to the Congress ideals will always be remembered. RIP. pic.twitter.com/Lx3LKAKK4Y
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) August 6, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.