HW News Marathi
देश / विदेश

शरद पवार- नितीन गडकरींची दिल्लीत भेट, राजकीय हालचाली होणार?

नवी दिल्ली | दिल्लीत सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशना दरम्यान दिल्लीत अनेक राजकीय हालचाली सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी भेट झाली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार ही बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, राजकारणातील या दोन दिग्गज नेत्यांच्या बैठकीमुळे चर्चा तर सुरु झालीच आहे. शिवाय अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये संसदेतील गोंधळावर मार्ग काढण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान राज्यातील परिस्थितीवरही चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधक गदारोळ घालत आहेत. त्यामुळे संसदेचं कामकाज होत नसल्याचं दिसून येत आहे. यावरच मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीन गडकरींना याबाबतची जबाबदारी सोपवली आहे. याचाच एक भाग म्हणून नितीन गडकरींनी शरद पवारांची भेट घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अ‍ॅमेझॉनचा मालक झाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

News Desk

नवे केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि लडाख यांच्या बद्दलेल्या सीमारेषाचा नकाशा

News Desk

“बेळगावमध्ये शिवरायांचा पुतळा काँग्रेस नेत्याने हटवलाय, शिवसेना राजीनामा देणार का ?”

News Desk