HW Marathi
Covid-19 देश / विदेश राजकारण

कोरोना रुग्णांचा मृतदेह बस स्टॅडवर, ‘हे’च गुजरात मॉडल आहे काय ?, मेवाणींनीचा सवाल

मुंबई | देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात गेल्या २४ तासात कोरोनाच्या ५ हजार २४२ नव्या रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात रुग्णांच्या संख्येत झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. तर देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६ हजार १६९ वर पोहोचली आहे. देशातील गुजरात राज्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. अहमदाबादमध्ये कोरोना रुग्णांचा मृतदेह बस स्टॅड येथे आढळून आल्याने राज्यात एकच खळबळ माजली.

गुजरातच्या अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयात ६७ वर्षीय व्यक्ती १० मे रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर १५ मे रोजी ६७ वर्षीय व्यक्तींच्या मुलाला पोलिसांनी फोन केला. पोलीस म्हणाले, तुझ्या वडिलांचा मृतदेह अहमदाबादच्या डॅनिलिम्डा क्रॉसिंगजवळील बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (बीआरटीएस) स्टेशनवर सापडला. मृत व्यक्तींचा मुलगा म्हणाला, “माझे वडील कोविड रुग्ण असूनही, कुटुंबातील सदस्यांनी अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया पार पाडली. आम्हाला फक्त त्याचा मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळण्यास सांगण्यात आले,” त्यांनी एका डिजिटल पोर्टल माहिती दिली.

रुग्णालयाचा ढिसाळ कारभार

मृत व्यक्तीमध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणे दिसून आली असून केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीनुसार त्यांना होम क्वारंटाईन करण्यास सांगितले होते. त्या व्यक्तींचा मृतदेह सापडण्यापूर्वीच्या एक दिवस आधीच म्हणजे १४ मे रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. रुग्णलयाने वाहनांनी मृत व्यक्तीस त्यांच्या घरी सोडण्याची सोय केली. मात्र, या व्यक्तींच्या घरा जवळील रस्ता अरुंद असल्यामुळे त्यांना त्यांच्या घराजवळीत बस स्टॅडवर सोडण्यात आले, अशी माहिती अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात डॉ. एम. एम. प्रभाकर यांनी एका डिजिटल पोर्टल माहिती दिली.

दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आरोग्य विभागाचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव राजीव गुप्ता हे चौकशी करणार आहेत. गुप्ता यांना २४ तासात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणावरून गुजरातचे राजकारण तापले आहे. अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी मुख्यमंत्र्यावर या प्रकरणावरून जोरदार टीका केली आहे.

मेवाणींनी ट्वीटमध्ये लिहिले, “रुपाणी यांनी या घटनेचे नैतिक जबाबदारी घेत आपले पद सोडावे, हा फक्त क्रिमिनिल ” गुजराज मॉडल उद्धवस्त झाले आहे. कोरोनाने गुजरातची अवस्था अशी झाली की, रुग्णालयाच्या बाहेर रुग्णांना देवाच्या भर्वश्यावर सोडले आहे. हद्द तर तेव्हा झाला, जेव्हा एका रुग्णांवर ५ दिवस रुग्णलयात उपचार सुरू होता. यानंतर त्यांचा मृतदेह बस स्टॅडवर सापडला.  हेच गुजरात मॉडल आहे काय ?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

 

Related posts

शरद पवारांच्या पुस्तकाच्या एका पानातून भाजप राजकारण करतयं,रोहित पवारांचा फडणवीसांवर आरोप !

News Desk

अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार

News Desk

लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख सदैव स्मरणात राहतील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आदरांजली

News Desk