HW News Marathi
देश / विदेश

२०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘अजेय भाजप’चा नारा

नवी दिल्ली | भाजप २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी ‘अजेय भाजप’चा नारा भाजपध्यक्ष अमित शहा यांनी दिला आहे. भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी आणि प्रदेशाध्यक्षांच्या झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा नारा दिला. तसेच सर्वांनासोबत घेऊन लढणार असून २०१४ पेक्षा अधिक बहुमताने भाजप सरकार स्थापन करण्याचा विश्वास यावेळी शहांनी व्यक्त केला असल्याची माहिती मिळाली आहे.

या वर्षाच्या अखेरीस मध्यप्रदेश, छत्तीसगड, आणि राजस्थानसह पाच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यात भाजपची सत्ता येण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप विजयी होणार असल्याचा विश्वास जेष्ठनी व्यक्त केला आहे. भाजप सरकारने या चार वर्षाच्या काळात नोटबंदी आणि जीएसटी यासारखे महत्त्वपुर्ण निर्णय घेतले असून त्यांची अंमलबजावणी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक परदेशी दौरे करून भारतात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काँग्रेसकडून ‘जंतर मंतर’ मैदानात आंदोलन, अधिवेशनात बऱ्याच अडचणी!

News Desk

आधार कार्ड हॅकच्या चॅलेंजमुळे ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा तोंडघशी पडले

swarit

गृहमंत्र्यांलयाकडून अमरनाथ यात्रेकरू, पर्यटकांना काश्मीर सोडण्याचे आदेश

News Desk
कृषी

सण बळीराजाच्या सर्जा-राजाचा

Gauri Tilekar

बैलपोळा हा श्रावणी अमावास्येला साजरा करण्यात येणारा बळीराजाच्या सण. शेतीच्या कामांमध्ये आणि बळीराजाच्या आयुष्यात बैलांचे विशेष महत्त्व असे असते. संपूर्ण वर्षभर खांद्यावर भार वाहणाऱ्या बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण विशेषतः बळीराजाकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे शेती नाही असे लोकदेखील मातीचे बैल तयार करून त्यांची पूजा करतात. भारतासारख्या शेतीप्रधान देशात तर या सणाला विशेष महत्त्व आहे. विशेषतः मध्य आणि पूर्व महाराष्ट्रात बैलपोळा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

वर्षभर प्रचंड मेहनत करणाऱ्या बैलांना पोळ्याच्या सणाला मात्र कामापासून संपूर्ण आराम असतो. बैल पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण दिले जाते. त्या दिवशी बैलांना नदीवर अंघोळ घातल्यानंतर चरायला नेऊन मग घरी आणले जाते. त्यानंतर बैलाच्या खांद्यांना हळद आणि तुपाने शेक देण्यात येतो. बैलपोळ्याच्या दिवशी बैलांचा थाट काही औरच असतो. या दिवशी बैलांच्या पाठीवर सुबक असे नक्षीकाम केलेली झूल पांघरली जाते. त्याचप्रमाणे त्याच्या अंगावर गेरूचे ठिपके, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या- घुंगरांच्या माळा, नवी वेसण, पायात चांदीचे आणि करदोड्याचे तोडे, शिंगांना बेगड, असा शृंगार करून बैलांना सजविले जाते. बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे बैलाची निगा राखणाऱ्या घरगड्यास ज्याला ‘बैलकरी’ असे म्हणतात त्याला नवीन कपडे देण्यात येतात.

सर्वांमध्ये आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपापल्यापरिने त्याचा साजशृंगार करतात आणि आपले बैल सजवितात. गावाच्या वेशीजवळच्या शेतात आंब्याच्या पानाचे मोठे तोरण करून बांधले जाते. त्यानंतर तिथे गावातील सर्व बैलजोड्या ढोल-ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस ‘झडत्या’ म्हणजेच बैलपोळ्याची गाणी गायची पद्धत आहे. त्यानंतर गावचा पाटील किंवा कोणताही श्रीमंत व्यक्ती ते तोरण तोडतो आणि पोळा ‘फुटतो’. त्यानंतर बैलांना मारुतीच्या देवळात नेले जाते आणि मग घरी नेऊन त्यांना ओवाळण्यात येते. बैल नेणाऱ्या व्यक्तीस ‘बोजारा’ देण्यात येते. आपल्या जीवभावाच्या मित्राचा सर्जा-राजाचा हा सण साजरा करताना बळीराजा प्रचंड उत्साहात असतो.

Related posts

शेतकरी मदतीबाबत सरकारने शब्द फिरवल्यास हक्कभंग आणणार ! विखे पाटील

News Desk

वऱ्हाडात यंदा करावी लागणार तिबार पेरणी

News Desk

गटशेती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या गटांना २०० कोटी रुपयांचा निधी

News Desk