HW News Marathi
देश / विदेश

लवकरच राफेल विमान भारतीय वायू दलाच्या ताफ्यात येणार

नवी दिल्ली । काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत राफेल लढाऊ विमान करारावरून रान पेटविले होते. राफेलच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत काँग्रेसने वारंवार भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आता राफेल विमान लवकरच फ्रान्समधून भारतात आणले जाणार आहेत. तत्पूर्वी भारतीय वायुसेनेचे व्हाईस चीफ एअर मार्शल राकेश कुमार सिंह भदौरीया यांनी गुरुवारी (११ जुलै) राफेल विमानातून भरारी घेतली. राफेल विमान भारतासाठी युद्धपातळीवर मोलाचे ठरणार असून वायुसेनेत सुखोईसोबत राफेल विमान तणावाच्या परिस्थितीत शस्त्रूंवर हल्ला करण्यास पुरेसे असल्याचे यावेळी राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी म्हटले.

राकेश कुमार सिंह भदौरिया यावेळी असे देखील म्हणाले कि, ‘राफेल विमानातून उड्डाण केल्यानंतर चांगला अनुभव मिळाला. याठिकाणी खूप काही शिकायला मिळाले असून वायुसेनेच्या ताफ्यात राफेलचा समावेश झाल्यानंतर त्याचा वापर योग्यरित्या करण्यात येईल. याशिवाय, आमच्या वायुसेनेच्या ताफ्यात सुखोई-३० सोबत राफेलचाही उपयोग होईल. या दोन विमानांनी एकत्र ऑपरेशन सुरु केल्यास पाकिस्तानला चांगलाच धक्का बसेल.’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली

News Desk

शहीद जवानाच्या वडिलांचा सरकारला अल्टिमेटम

News Desk

ज्योतिरादित्य शिंदे यांना काँग्रेस अध्यक्ष करा, मध्ये प्रदेशमध्ये बॅनरबाजी

News Desk