HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपमध्ये प्रवेश करणा-या १० आमदारांना शहांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

पणजी । चांगले कामे केल्यानंतर मग लोकही तुम्हाला साथ देतील असा कानमंत्र गोव्याच्या दहाही आमदारांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दिला. शहा यांनी दहा आमदारांनी गुरूवारी (११जुलै) रात्री ११ वाजता दिल्लीत भेट घेतली. काँग्रेसमधून हे दहा आमदार भाजपमध्ये प्रवेश केला आहेत. शहा यांनी त्यांचे स्वागत केल्यानंतर “जनतेची कामे करा, जनतेसोबत चांगले वागा, मग जनता नक्की तुम्हाला पाठिंबा देईल, असे शहा यांनी सांगितले.

ज्यावेळी दहा आमदार अमित शहा यांना भेटले, त्यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोवा प्रदेश भाजपची कोअर टीम उपस्थित होती. दरम्यान, गोवा फॉरवर्डचे तीन मंत्री आणि अपक्ष मंत्री रोहन खंवटे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाले. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई हे भाजपाप्रणीत आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना डच्चू देण्याचे ठरले. चार नव्या आमदारांचा मंत्री म्हणून उद्या (१३ जुलै) शनिवारी दुपारी तीन वाजता शपथविधी होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ‘पाणलोट विकास घटक २.०’ योजना राबविण्याबाबत काटेकोर नियोजन करण्याचे शंकरराव गडाख यांचे निर्देश

Aprna

‘दुल्हन हम ले जायेंगे’ म्हणत IT विभागाने काढली वरात; जालन्यात कोट्यवधींचं घबाड जप्त

Manasi Devkar

भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली २० जणांना बाहेर काढले तर १० जणांचा मृत्यू

News Desk