कोलंबो | जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना मात्र श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये रविवारी (२१ एप्रिल) चर्च आणि हॉटेल यांना लक्ष्य करून आठ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले. या बॉम्बस्फोटात ३२१ हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ५०० अधिक जण जखमी झाले होते. श्रीलंकेत काल (२२ एप्रिल) दिवसभरात ८७ बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमधील चर्चमध्ये बॉम्बनिकामी करताना बॉम्बस्फोट झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी देशात आणीबाणी लागू केली आहे.
#WATCH Colombo: CCTV footage of suspected suicide bomber (carrying a backpack) walking into St Sebastian church on Easter Sunday. #SriLankaBombings (Video courtesy- Siyatha TV) pic.twitter.com/YAe089D72h
— ANI (@ANI) April 23, 2019
या साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर एक सीसीटीव्ही फुटेजसमोर आले आहे. या फुटेजनुसार एक अज्ञात तरुण खांद्यावर बॅग घेऊन स्टेंट सॅबेस्टिअन चर्च परिसरात पोहचला होता. आणि त्याच्या बॅगमध्ये स्फोटके घेऊन चर्चमध्ये पोहोचल्यानंतर काही वेळानंतर स्फोट झाला. कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाले.
साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.