HW News Marathi
देश / विदेश

बिहार विधानसभा निवडणूकीत समन्वयाची जबाबदारी सुनील केदार यांच्यावर सोपवली

वर्धा | बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर आल्या आहेत. अशात शिवसेना बिराहमध्ये धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढू शकणार नाही असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. तसेच, काँग्रेसचे दिग्गज नेते आणि पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या खांद्यावर पक्षाने नवी जबाबदारी सोपवली आहे. मध्यप्रदेशमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत समन्वयाची जबाबदारी सुनील केदार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सुनील केदार यांची नियुक्ती केली आहे. मुरैना आणि ग्वाल्हेर या दोन्ही जिल्ह्यांचे निवडणूक समन्वयक म्हणून सुनील केदार काम पाहणार आहेत. म्हणजेच नुकतेच भाजपवासी झालेले राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांना सुनील केदार आव्हान देणार आहेत.मुरैना जिल्ह्यातील जौरा, सुमावली, मुरैना, दिमनी आणि अंबाह, तर ग्वाल्हेर जिल्ह्यातील ग्वाल्हेर, ग्वाल्हेर पूर्व आणि डबरा या विधानसभा मतदारसंघात येत्या काळात पोटनिवडणूक होत आहे. यापूर्वीही सुनील केदार यांनी बिहार निवडणुकीत काँग्रेसचे समन्वयक म्हणून काम केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ताजमहालमध्ये बॉम्बच्या अफवेने उडाली खळबळ, एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

News Desk

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने ‘या’मुळे नकारली

Aprna

‘शरद पवारांकडून अमित शहांना खास आमंत्रण’, पुण्यात होणार दुसरी भेट

News Desk