HW News Marathi
देश / विदेश

पोलीस निरीक्षक सुबोध कुमार यांच्या हत्येप्रकरणी संशयित जवानाला अटक

लखनऊ | उत्तर प्रदेशातील बुलंदशहर हिंसाचारादरम्यान पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांची हत्या झाली होती. या प्रकरणी जवान जितेंद्र मलिकला काश्मीरमधून अटक करण्यात आली आहे. जितेंद्र मलिकने पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांचीच खाली पडलेली पिस्तूल घेऊन त्यांच्यावरच गोळी झाडली, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सैन्याने शनिवारी (८ डिसेंबर) जितेंद्रला विशेष कार्य दलाच्या (एसटीएफ) ताब्यात दिले असून सध्या त्याची कसून चौकशी सुरु आहे.

जितेंद्रला आज (९ डिसेंबर) न्यायालयात हजर केले जाईल. जितेंद्र हा जम्मूतील सोपोरामध्ये २२ राष्ट्रीय रायफल दलात कार्यरत असून तो १५ दिवसांच्या सुट्टीवर आपल्या गावी आला होता. दरम्यान, जितेंद्र हा या दिवशी आरोपी योगेश राज याच्यासोबत उभा राहून घोषणा देत होता, हे सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. परंतु, त्याच्या पत्नीने जितेंद्र त्या दिवशी बाहेरगावी खरेदीला गेला होता, असा दावा केला होता.

उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यात सोमवारी (३ डिसेंबर) स्यानामधील एका गावातील शेतात मृत गायीचे अवशेष आढळले होते. त्यानंतर येथील लोकांनी संतप्त होऊन रास्ता रोको केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांची हत्या झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गर्भपाताचा परवानगी नाकरलेली ‘ती’ने दिला बाळाला जन्म

News Desk

“या चोऱ्यामाऱ्या करणं थांबवलं पाहिजे?”, राऊतांचं पेगॅससवर भाष्य

News Desk

‘पेगॅसस’ला अब्जावधी रुपये दिले, हा अर्थपुरवठा करणारे कोण, याचा तपास कोणी लावील का?

swarit
राजकारण

अखेर शरद यादव यांनी वसुंधरा राजेंची माफी मागितली

News Desk

जयपूर | ‘वसुंधरा राजे यांचे आणि माझे जुने कौटुंबिक संबंध आहेत. माझ्या विधानामुळे जर त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो. मी त्यांना याबाबत पत्र देखील लिहिणार आहे’, असे जनता दलाचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी म्हटले आहे. राजस्थानमधील अलवर येथे निवडणुकांच्या प्रचारादरम्यान शरद यादव यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे याच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते.

‘राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे खूप थकल्या आहेत, जाड झाल्या आहेत. आता त्यांना आराम द्यायला हवा’, असे विधान निवडणुकांच्या प्रचारादरम्यान शरद यादव यांनी केले होते. त्यांचे हे विधान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील झाले होते. त्यामुळे शरद यादव यांच्यावर सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणावर टीका झाली.

‘शरद यादव यांच्या विधानामुळे मला धक्का बसला आहे. इतका मोठ्या नेत्याला आपल्या जीभेवर संयम ठेवता आला नाही, याचे दुःख वाटते. निवडणूक आयोगाने या प्रकाराची दखल घ्यावी जेणेकरून यापुढे अशा घटना घडू नयेत. शरद यादव यांनी असे विधान करून माझा अपमान केला आहे. हा केवळ माझा नव्हे तर संपूर्ण महिलावर्गाचा अपमान आहे’ असे म्हणत वसुंधरा राजेंनी शरद यादव यांचा खरपूस समाचार घेतला.

Related posts

“मला जर कोणी गद्दार शिव्या देत असतील तर…”, संजय राऊतांचा शिंदे गटाला खोचक टोला

Aprna

बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड; उपमुख्यमंत्र्याचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन

Aprna

शिवस्मारकाच्या प्रकल्पास स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

swarit