केरळ | केरळ नन बलात्कार प्रकरणातील मुख्य साक्षीदार कॅथलिक पादरी कुरिआकोसे कत्तूथारा (६१) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. केरळमधील ननवर १३ वेळा बलात्कार करणाऱ्या आरोपी बिशप फ्रान्सो मुलाक्कालविरोधात कत्तूथारा यांनी साक्ष दिली होती. कत्तूथारा हे जालंधरमधील सेंट मेरी चर्चमध्ये मृतावस्थेत आढळले आहेत. कत्तूथारा यांनी आत्महत्या केली कि त्यांची हत्या करण्यात आली आहे याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
#WATCH: AR Sharma, DSP Dasuya, says on death of Kerala nun rape case witness Father Kuriakose Kattuthara, "It was found that he vomited over the bed. Blood pressure tablets were found at the spot. Investigation is underway" pic.twitter.com/TChDoaWfes
— ANI (@ANI) October 22, 2018
पादरी कुरिआकोसे कत्तूथारा यांच्या संशायास्पद मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांनी शंका व्यक्त केली आहे. कत्तूथारा यांना गेल्या काही दिवसांपासून धमक्या येत होत्या, अशी माहिती मिळते. त्यांच्या मृत्यूमागे आरोपी बिशप फ्रान्सो मुलाक्काल यांचा कट असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.
आरोपी बिशप फ्रान्सो मुलाक्कालविरोधात साक्ष दिल्याने कत्तूथारा यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, जालंधर पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.