HW News Marathi
देश / विदेश

नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा आज होणार विस्तार

मुंबई | बिहारमध्ये आरजेडी-जेडीयू यांचे महागठबंधन असलेले सरकार बिहारमध्ये स्थापन झाले आहे. यानंतर बिहारमध्ये आज नितीश कुमार (Nitish Kumar) आणि तेजस्वी यादव यांच्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) होणार आहे. या मंत्रिमंडळात 15 जेडीयू तर 15 आरजेडी एकूण 30 आमदार आज (16 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता राजभवनात मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यात जेडीयू, काँग्रेस, अपक्ष आणि हम पक्षाच्या नेत्यांची नावे आहेत.

 

बिहारमधील महागठबंधनमध्ये सात पक्ष एकूण 164 आमदारांचा पाठिंब्याचे पत्र काल नितीश कुमारांनी सोपविले होते. या यादीत विजय चौधरी, बिजेंद्र यादव, श्रवण कुमार, संजय झा, सुनील कुमार या नावांचा समावेश आहे. अपक्षकडून सुमित आणि हम पार्टीचे संतोष सुमन तर काँग्रेस अफाक आलम आणि मुरारी गौतम हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.  बिहार विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २४२ आहे. यात भाजपाचे एकूण ७७ तर जदयुचे ४५ आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चा (सेक्यूलर) ४, राजद ७९ काँग्रेस १९ सीपीआय (एमएल) १२, सीपीआय १४, एमआयएम आणि अपक्ष प्रत्येकी एक असे बहुमत आहे.

 

जेडीयूमधून यांना मिळाले मंत्री पद

  • तेज प्रताप यादव
  • आलोक मेहता
  • अनिता देवी
  • सुरेंद्र यादव
  • चंद्रशेखर
  • ललित यादव
  • भाऊ वीरेंद्र
  • रामानंद यादव
  • सुधाकर सिंग
  • सरबजीत कुमार
  • सुरेंद्र राम
  • अख्तरुल शाहीन
  • कार्तिक सिंग
  • समीर महासेठ
  • शाहनवाज
  • भारतभूषण मंडळ

 

संबंधित बातम्या

नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा

नितीश कुमार यांनी आठव्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री पदी विराजमान

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसने संविधानाचे रक्षण केले म्हणूनच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला !

News Desk

“केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे फायद्याचेच”,राष्ट्रपतींनी केली पाठराखण

News Desk

भाजपमध्ये प्रवेश करणार नाही- सचिन पायलट

News Desk