श्रीनगर | काश्मीरमधील वागुरा नौगाम सेक्टरमध्ये शुक्रवारी (२६ ऑक्टोबर) रात्री दहशतवाद्यांनी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला. दहशतवाद्यांच्या या ग्रेनेड हल्ल्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (सीआयएसएफ) अधिकारी शहीद झाला आहे. भारत सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
Terrorists lobbed a grenade on a CISF ASI deployed for security of a power grid at Wagoora Nowgam in Srinagar, late last night. ASI Rajesh Kumar lost his life in the incident. Area cordoned off #JammuAndKashmir pic.twitter.com/DjezTZI6AC
— ANI (@ANI) October 27, 2018
सीआयएसएफ एएसआय राजेश कुमार यांना वागुरा नौगाम सेक्टरमध्ये पॉवर ग्रीडच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं होतं. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर ग्रेनेड हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात राजेश कुमार शहीद झाले आहेत. तसेच परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने जवानांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
उत्तर काश्मीरच्या सोपोरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्या शुक्रवारी (२६ ऑक्टोबर)ला झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून एक जवान शहीद झाला आहे. भारतीय लष्कराकडून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात राबवण्यात येत असलेल्या मोहिमे अंतर्गत गुरुवारी (२५ ऑक्टोबर)ला ६ दहशतवाद्यांना खात्मा करण्यात मोठे यश आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.