HW News Marathi
Covid-19

जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा ४४ लाखांहून अधिक, तर अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग

मुंबई | जगभरात गेल्या २४ तासात ८८ हजार २०२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५ हजार ३१४ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जगभरात आतापर्यंत ४४ लाखांहून अधिक कोरोनाचा संसर्ग झाला असून २ लाख ९७ हजार जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे जगभरात १६ लाख ५७ हजार ७१६ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती वर्ल्डोमीटरच्या आकडेवारी दिली आहे.

अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग आहे. अमेरिकेत १, ४३०,३४८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर ८५, १९७ लोकांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत ३३,१८६ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच स्पेनमध्ये २७१, ०९५ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर २७, १०४ जणांचा मत्यू झाला आहे. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत ३१, १०६ मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा २२२,१०४ इतका आहे.

दरम्यान, रशियामध्ये २४२, २७१ जणांना कोरोनाची लागण झाली तर २,२१२ कोरोनामुळे प्राण गमावले आहे. ब्राझिलमध्ये १८९,१५७ जण कोरोना ग्रस्त आहेत. तर १३,१५८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये १७८,०६० लोकांना कोरोनाचा संसर्ग तर २७,०७४ कोरोनाने जिव घेतला आहे. जर्मनीत १७४,०९८ जणांना कोरोना झाला असून ७,८६१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर टर्कीत १४३,११४ जण कोरोनाग्रस्त तर ३,९५२ जणांचा मृत्यू, इरानमध्ये ११२,७२५ कोरोनाग्रस्त तर ६,७८३ जण कोरोनाने आपले प्राण गमवले आहे. चीनमध्ये ८२,९२६ कोरोनाचा संसर्ग झाला असून ४,६३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘म्युकर मायकॉसीस’च्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार | राजेश टोपे

News Desk

अजित पवार हेडमास्तर, उद्धव ठाकरेंनी काहीतरी शिकावे !

News Desk

राज्यात कोरोनाचा कहर ! आज तब्बल ४० हजारांहून अधिक नवे रुग्ण

News Desk