नवी दिल्ली | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पाश्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (५ एप्रिल) माजी पंतप्रधान आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची फोनवरून चर्चा केली आहे. यावेळी मोदींनी देशावर ओढविलेल्या कोरोना संकट आणि देशातील राजात वाढता कोरोनाग्रस्तांचा आकडा यावर चर्चा केल्याची माहिती मिळलाी आहे. कोरोना व्हायरसच्या देशात वाढत्या संकटासंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ एप्रिलला सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे.
He also called up leaders of various political parties like Sonia Gandhi, Mulayam Singh Yadav, Akhilesh Yadav, Mamata Banerjee, Naveen Patnaik, K Chandrashekar Rao, MK Stalin and Parkash Singh Badal. #Coronavirus https://t.co/V7hL8FIh5F
— ANI (@ANI) April 5, 2020
यावेळी मोदींनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि एच डी देवेगौडा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, द्रमुक प्रमुख एम.के. स्टालिन, तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर, अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल यांच्याशीही मोदींनी फोनवरुन संवाद साधला
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.