HW News Marathi
देश / विदेश

तीन दिवस बँका सुट्टीवर

मुंबई | देशभरातील बँका तीन दिवस बंद राहणार असल्यामुळे ग्राहकांनी शक्य असेल तितका आॅनलाईन व्यवहार करावा, असे आवाहन बँकांच्या वतीने करण्यात आले आहे. शुक्रवार, आज ( २३ नोव्हेंबर)ला गुरुनानक जयंती, उद्या चौथा शनिवार (२४नोव्हेंबर) आणि रविवार (२५नोव्हेंबर) असे सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे एटीएममध्ये पैशांचा खडखडाट होऊ शकतो.

यामुळे ग्राहकांनी शक्यतो आॅनलाईन व्यवहार करावेत असे आवाहन बँकांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच सोमवारी (२६नोव्हेंबर) बँकांचे कामकाज सुरू झाल्यानंतर या दिवशी ओव्हरलोडमुळे चेक क्लिअरिंगच्या कामास तीन ते चार दिवस लागू शकतात, असेही बँकांकडून सांगण्यात येत आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुगलनेही सर्व कर्मचाऱ्याना वर्क फ्रॉम होमचे दिले आदेश

swarit

गुजरातमध्ये पतंगाच्या मांज्यामुळे गळा कापला जाऊन ६ जणांचा मृत्यू

News Desk

‘ भारत बंद’वेळी नाना पटोलेंचा मोदी सरकारवर घणाघात

News Desk