HW News Marathi
देश / विदेश

अमेरिका-चीनमध्ये व्यापारविषयक चर्चा, अमेरिकेचा पुढाकार

हॉंगकॉंग | गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीन या देशांदरम्यान सुरू असलेले व्यापारामुळे निर्माण झालेला संघर्ष आता मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने बिघडलेल्या व्यापार संबंधावर तोडगा काढण्यासाठी चीनसमोर चर्चेचा हात पुढे केला आहे. अमेरिकेच्या या ऑफर चीनने देखील स्वीकारली आहे.

अमेरिकेने शुल्क लागू केल्याने चीनचा निर्यात उद्योग कोलमडला आहे. एकूणचं चीनच्या अर्थव्यवस्थेला याचा फटका बसला आहे. “दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय चर्चा होत आहे. व्यापार संघर्ष हा दोन्ही देशांसाठी फायद्याचा नाही,” असे चीनचे वाणिज्यमंत्री गांव फेंग यांनी म्हटले आहे.

चर्चेचे कारण काय ?

चिनी वस्तूंवर आणखी अधिक शुल्क लागू करण्याची धमकी ट्रम्प प्रशासनाने दिली होती. दोन्ही देशांनी एकमेंकाविरोधात २५ टक्के आयात शुल्क लागू केले असून हे शुल्क ५० अब्ज डॉलर एवढे आहे. तसेच हजारो चिनी वस्तूंवर आयात शुल्क लागू केल्यास त्या अमेरिकेतील ग्राहकांना महाग पडणार आहेत. तर अमेरिकेला जशास तसे उत्तर देण्यासाठी चीननेही अमेरिकेतून निर्यात होणारे मांस, कॉफी आदी ६० अब्ज डॉलर एवढ्या किमतीच्या वस्तूंवर आयात शुल्क लागू करण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांदरम्यान व्यापारासंबंधी चर्चा होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नोटबंदीमुळे कष्टकरी उद्धवस्त: राहुल गांधी

News Desk

काँग्रेसची पाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात, मोदींची संतप्त टीका

News Desk

नवाझ शरीफ यांना पाकिस्तान सुप्रीम कोर्टाचा दणका

News Desk