काराकस | व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस माडुरो यांच्यावर शनिवारी ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात निकोलस थोडक्यात बचावले. निकोलस हे व्हेनेझुएलाची राजधानी काराकस येथे आपल्या सैनिकांसमोर भाषण दरम्यान राष्ट्रपतींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला.
An explosive drone went off in Caracas when President Nicolas Maduro was addressing a live televised speech, said the Venezuelan officials
Read @ANI Story | https://t.co/BRUTQOrZiY pic.twitter.com/Gp0yuE4ArV
— ANI Digital (@ani_digital) August 5, 2018
निकोलस यांचे भाषण सुरू असताना त्यांच्यापासून जवळच स्फोटके भरलेले काही ड्रोन पडले. फायर फायटर्सने हा हल्ल्यचा प्रयत्न हाणून पाडला. परंतु या हल्लामुळे कार्यक्रमाच्या आसपास असलेले नागरीक स्फोटाच्या आवाजाने पळापळी झाली. हा हल्ला निकोलस यांना लक्ष्य करून करण्यात आला. परंतु निकोलस सुरक्षित आहेत. या हल्ल्यात एकूण सात जण जखमी झाले असल्याची माहिती व्हेनेझुएलाचे माहिती मंत्री जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी दिली आहे.
व्हेनेझुएलातील एनटीएन २४ या टीव्ही चॅनलने या हल्लाशी निगडित एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, राष्ट्रपती निकोलस माडुरो यांच्या भाषणा दरम्यान स्फोटांचा आवाज ऐकायला येतो. यानंतर राष्ट्रपतींची पत्नी आणि अन्य अधिकारी सर्व आकाशाकडे पाहताना दिसत आहे.
#VIDEO ¿Atentado o accidente? Aparente explosión en acto de Maduro genera confusión https://t.co/U4bhFp2xJy pic.twitter.com/xTNPGvlUcn
— NTN24 Venezuela (@NTN24ve) August 5, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.