नवी दिल्ली | भारताच्या ‘चंद्रयान-१’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. इस्रोने चंद्राच्या पृष्ठभागावर बर्फाच्या स्वरूपात पाणी सापडल्याच्या केलेल्या दाव्याला नासाने देखील दुजोरा दिला आहे. ‘चंद्रयान-१’ या यानाने चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात पाणी सापडल्याची माहिती आकडेवारीसह दिली होती. इस्रोच्या या शोधाला आता नासाने देखील पुष्टी दिली आहे.
In the darkest and coldest parts of the Moon's poles, ice deposits have been found. At the southern pole, most of the ice is concentrated at lunar craters, while the northern pole’s ice is more widely, but sparsely spread. More on this @NASAMoon discovery: https://t.co/kvjPbMrEWK pic.twitter.com/ZkVFyKrOB6
— NASA (@NASA) August 20, 2018
पीएनएस मासिकात प्रकाशित झालेल्या प्रबंधानुसार, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फ आढळला आहे. दक्षिण ध्रुवावरील लुनर केटर्सजवळ हा बर्फ गोळा झालेला आहे. तसेच चंद्राच्या उत्तर ध्रुवावरही मोठ्या प्रमाणात बर्फ आढळला असून तो विखुरलेल्या अवस्थेत आहे. नासाच्या मून मिनरेलॉजी मॅपर (एम 3) कडून मिळालेल्या आकडेवारीवरून चंद्राच्या पृष्ठभागावर बर्फाच्या रूपात पाणी असल्याचे सांगण्यात आले होते. इस्त्रोच्या ‘चंद्रयान-1’सोबत ‘एम 3’ हे उपकरण पाठवण्यात आले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.