HW News Marathi
देश / विदेश

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे थेट ‘एलोन मस्क’ ला महाराष्ट्रात येण्याचे जाहीर आमंत्रण

मुंबई | सुप्रसिद्ध टेस्ला कारचे मालक एलोन मस्कला महाराष्ट्रात येण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन जाहीर आमंत्रण दिले आहे. सुप्रसिद्ध टेस्ला कारचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही महाराष्ट्रात बनवू शकता, असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सुप्रसिद्ध टेस्ला कारचे लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आकर्षण आहे. ही कार भारतात कधी लाँच करणार असा प्रश्न ट्विटरवरील एका युजरने एलोन मस्कला विचारला त्यावर काही शासकीय नियमांच्या अडचणींचा सामना करत असल्याचे मस्क याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे, तुमच्या उभारणीसाठी तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. सुप्रसिद्ध टेस्ला कारचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही महाराष्ट्रात बनवू शकता, असे म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एलोन मस्कला महाराष्ट्रात आमंत्रित केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीबीआयच्या नव्या संचालकपदी ऋषीकुमार शुक्ला यांची नियुक्ती

News Desk

सांगलीच्या संभाजी गुरव यांनी एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा, महाराष्ट्र पोलिसातील पहिले मराठी अधिकारी

News Desk

टाईम मॅक्झिनच्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान मोदींचा समावेश

News Desk