मुंबई | भारतीय वायूदलाचे M-17V5 हेलिकॉप्टर तमिळनाडूमधील कन्नरमध्ये कोसळले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत हे प्रवास करत होते. बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत त्यांच्यासोबत होत्या. या दुर्घटनेत ११ जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आलेला आहे. तर या दुर्घटनेत ३ जण गंभीर जखमी असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश भारतीय वायुदलाने दिले आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जणापैकी ६ जण हे लष्करी अधिकारी होते. घटनास्थळी बचाव कार्य असल्याची माहिती मिळाली आहे.
रावत हे त्यांच्या पत्नीसह वेलिंग्टन येथे आर्म्ड फोर्सच्या महाविद्यालयात त्यांचे लेक्चर होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एका कार्यक्रमासाठी जात होते. कुन्नरमधील घनदाट जंगला परिसर आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत यांची पत्नी मधुलिका रावत या देखील गंभीर जखमी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या दुर्घटनेची माहिती देण्यात आली आहे.
हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करणाऱ्यांची नावे
- सीडीएस बिपीन रावत
- मधुलिका रावत
- ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर
- लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग
- गुरुसेवक सिंग
- जितेंद्र कुमार
- विवेक कुमार
- बी. साई तेजा
- हवालदार सतपाल
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.