HW News Marathi
देश / विदेश

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपसभापती पदासाठी निवडणूक होणार 

नवी दिल्ली | संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या १४ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. पहिल्याच दिवशी राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक होणार असल्याने भाजपने सर्व सदस्यांना उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील २ दिवसांचे पालसाळी अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबरला पार पडले.

भाजपने राज्यसभेवरील आपल्या सर्व खासदारांना १४ सप्टेंबर रोजी सभागृहात हजर राहण्याचे आदेश देण्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला. विरोधी पक्षांनी एकत्रितपणे उमेदवार देण्याचा चंग बांधला असला, तरी निवडणुकीत भाजपचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबरपासून १ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. दरम्यान उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम तारीख ११ सप्टेंबरपर्यंत आहे.

राज्यसभेचे उपसभापती म्हणून हरीवंश यांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपल्यामुळे ही निवडणूक होणार आहे. सत्ताधारी भाजप-एनडीएकडून पुन्हा जनता दल (युनायटेड) चे खासदार हरीवंश यांनाच उमेदवारी देण्यात आली. त्यांनी आज (९ सप्टेंबर) आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.गेल्या निवडणुकीत हरीवंश यांनी काँग्रेस उमेदवार बी. के. हरीप्रसाद यांचा पराभव केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुधा भारद्वाज पुणे पोलिसांच्या ताब्यात

swarit

‘काही गोष्टी सावर्जनिक करायच्या नसतात’शरद पवारांच्या भेटीवर अमित शहा बोलले !

News Desk

राफेल कराराचे सर्व लाभ थेट पंतप्रधानांना होत असल्याचा काँग्रेसचा आरोप

News Desk