HW News Marathi
देश / विदेश

आपच्या मदतीला यशवंत सिन्हा

नवी दिल्लीः प्रॉफिट ऑफ बेनिफीटखाली दोषी ठरल्याने दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचे सरकार अडचणीत आले आहे. निवडणूक आयोगाने आपच्या 20 आमादारांना अपात्र ठरवण्याबाबत राष्ट्रपतींकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यावर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केल्याने आपच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, ही कारवाई म्हणजे तुघलकशाही असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणात केजरीवाल एकाकी पडलेले असताना त्यांच्या मदतीला सिन्हा धावून आले आहेत. सिन्हा यांनी थेट राष्ट्रपतींच्या निर्णयावर टीकास्र सोडले आहे.’राष्ट्रपतींनी ‘आप’च्या २० आमदरांना अपात्र घोषित करणे नैसर्गिक न्यायाच्या सिद्धांताविरोधात असल्याचे त्यांनी टिवटद्वारे म्हटले आहे. या निर्णयावर कोणतीच सुनावणी झाली नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचीही वाट पाहिली नाही. त्यामुळे हा आदेश म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ही तुघलकशाही आहे,’ अशी टिका यशवंत सिन्हा यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुकांच्या तोंडावर कन्नडींगांचे भाषाप्रेम जागे

News Desk

अमेरिकेत शाळेत गोळीबार 17 ठार

swarit

कुलभूषण जाधव प्रकरणात आयसीजेत आज निकाल

News Desk