HW News Marathi
व्हिडीओ

सत्तेत असूनही विरोधात ! काँग्रेस शिवसेनेचाच पत्ता गिरवतयं का ?

महाविकास आघाडी सरकारमधली काँग्रेसची ही आता नवीन नाही. वेळोवेळी आपण ह्यावर बोललोय. सरकरमध्ये इतर दोन पक्षांपेक्षा मिळणारे दुय्यम स्थान, विकासनिधीबाबतची तक्रार आणि सरकारच्या प्रमुख निर्णयामध्ये आपल्याला सामावून घेतले जात नसल्यचा किंवा आपल्याला अंधारात ठेवून अन्य दोन पक्षच सर्व निर्णय घेत असल्याचा आरोप वारंवार काँग्रेसकडून होत आलाय. आताचं ताजं प्रकरण आहे की, ठाकरे सरकारने काहीच दिवसांपूर्वी मागासवर्गीयांचे पदोन्नती आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. ज्या निर्णयाबाबत सरकारमधील एक प्रमुख सहकारी पक्ष असलेल्या कॉंग्रेसला कल्पनाच नव्हती किंवा विश्वासात घेतलं नाही, असा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलाय. हा निर्णय असंविधानीक असून सरकारला आपण मागे घ्यायला लावू, असा स्पष्ट इशारा सुदधा दिलाय. त्यामुळे, निश्चित पुन्हा सरकारमधली अंतर्गत भांडणं चव्हाट्यावर येण्याची दाट शक्यता आहे. आता हे सगळं पाहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते ती म्हणजे यापूर्वी भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये जशी शिवसेनेची अवस्था झाली होती. तशीच अवस्था आता महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसची झालीय. आणि याच मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत

#NanaPatole #UddhavThackeray #MVA #BJPShivsena #DevendraFadnavis #Maharashtra #MahaYuti #AjitPawar #Sharad Pawar #NCP #Congress #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नागपूरची चड्डी ज्यांनी घातली तो डायरेक्ट…”, नाना पटोले यांचं वक्तव्य

Manasi Devkar

पिकाला शासनाची साथ नाहीच! Buldhana मधून ‘हा’ Ground Report

News Desk

Sanjay Raut ED च्या ताब्यात, 9 तासांच्या चौकशीनंतर कारवाई!

News Desk