HW News Marathi
व्हिडीओ

धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणु शर्माने मलाही त्रास दिला,भाजप नेत्याचा गौप्यस्फोट!

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्कार आरोपाच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. कारण आता भाजपचे नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुंबई पोलिसांना यासंदर्भात सविस्तर पत्र लिहून माहिती दिली आहे. रेणू शर्माने मलाही रिलेशनमध्ये येण्यासाठी दबाव आणला होता असे कृष्णा हेगडे यांनी या पत्रात लिहिले आहे.या पत्रात कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. २०१० पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या.मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी २०१५ पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले.मात्र, मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला समजली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी, असे कृष्णा हेगडे यांनी पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे कृष्णा हेगडे यांनी या पत्रामध्ये रेणू शर्मा ज्या फोन नंबरवरुन संपर्क साधायच्या ते क्रमांकही दिले आहेत. आता कृष्णा हेगडे थोड्यावेळात अंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करणार आहेत.

#DhananjayMunde #KrishnaHegde #BJP #NCP #RenuSharma #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP Sambhajiraje यांना पाठिंबा देणार की तिसरा उमेदवार रिंगणात उतरवणार

News Desk

“Pankaja Munde यांना मुख्यमंत्री करा”, BJP पदाधिकाऱ्यांचा सूर

Manasi Devkar

शरद पवारांनी घेतली मोदींची भेट! काय घडलं भेटीत?

News Desk