HW News Marathi
व्हिडीओ

“…मग शरद पवारांनाच मुख्यमंत्रीपद द्या..!”; ST कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून BJP ची टोलेबाजी

गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अखेर पुढाकार घेतला आणि अधिकृतपणे हस्तक्षेप केला. सोमवारी शरद पवार आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांची २२ कर्मचारी संघटनांच्या कृती समितीसोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अनिल परब शरद पवार आणि कृती समितीने दिलेले निवेदन महत्त्वपूर्ण ठरलं. अनिल परब यांनी सांगितलं कि, आतापर्यंत कर्मचारी जर कामावर परतले तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. याशिवाय शरद पवारांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं तर कृती समितीने वकील गुणरत्न सदावर्तेनवर निशाणा साधला. हि पत्रकार परिषद म्हणूनच अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. दरम्यान, त्यानंतर भाजपने मात्र यावरूनही टीकेची संधी साधलीच. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन परिवहन मंत्री अनिल परब यांना लक्ष्य केलंय. इतकंच नव्हे तर भाजपचे दुसरे नेते राम कदमांनी थेट शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. नेमकं काय घडलं? जाणून घेऊया.

#SharadPawar #UddhavThackeray #MSRTC #AnilParab #GopichandPadalkar #SadabhauKhot #STEmployees #MSRTC #MSRTCEmployee #MVA #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Devendra Fadnavis, Ajit Pawar | मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांवर पलटवार

News Desk

“हिंदुहृदयसम्राट ते जनाब बाळासाहेब ठाकरे ! शिवसेनेची कौतुकास्पद कामगिरी”, भाजपने शिवसेनेला डीवचलं

News Desk

Nitesh Rane यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम!

News Desk