राज्यात एकीकडे अनेक मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. अशात अनेक नेत्यांच्या गाठीभेठी सुरु आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात गाजत आहे. खासदार संभाजीराजे यांनी नुकतीच अनेक दिग्गज नेत्यांची या संदर्भात भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज (३१ मे) माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रववादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. फडणवीस आणि पवार यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तृळात चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ट्विट करत शरद पवारांची सदिच्छा भेट घेतल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे तुर्तास तरी या चर्चांना पुर्णविराम लागला आहे. मात्र, तरीही राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. त्या संदर्भात या दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचं म्हटलं जात आहे.
#sharadpawar #devendrafadnavis #bjp #ncp #obcreservation #marathareservation #maharashtra #mahavikasaghadi
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.