HW News Marathi
व्हिडीओ

‘संजय राऊत खातो शिवसेनेचं पण निष्ठा शरद पवारांवर’, पडळकरांची जहरी टीका!

संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला चार महिन्यांत आरक्षण मिळवून देईन, असे फडणवीस म्हणतात. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असेच वक्तव्य केले होते. ते मला चांगले आठवत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यांवर आता संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा आहे. अशा भाटांची धनगर समाजाला आवश्यकता नाही, अशी बोचरी टीका भाजपचे विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. संजय राऊत (Sanjay Raut) खातात शिवसेनेचं पण जागतात पवारांच्या निष्ठेला, असेही पडळकर यांनी म्हटले.

#gopichandpadalkar #sanjayraut #sharadpawar #bjp #shivsena #ncp

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस भरती बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

News Desk

Bhosari जमीन गैरव्यवहार प्रकरणी Eknath Khadse यांच्यावरचे आरोप अखेर सिद्ध! …तेव्हा होते BJP मध्ये

News Desk

Raut यांच्या Rajya Sabha संदर्भातील ‘त्या’ वक्तव्यावरून अपक्ष आमदारांचा इशारा!

News Desk