अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर गेलेल्या बड्या नेत्यांची घरवापसी होणार असल्याचा दावा केलाय. नवाब मलिक यांना शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांच्या भेटीविषयी विचारलं असता त्यांनी शिवेंद्रराजेच नव्हे, तर राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक जण परत येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा केलाय. तसेच लवकरच या इच्छुकांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे राष्ट्रवादीत अनेकांची घरवापसी होणार असल्याचं दिसतंय.
#AjitPawar #ShivendraRajeBhosale #NawabMalik #NCP #BJP #DevendraFadnavis #ChandrakantPatil #ShashikantShinde #Maharashtra #MahaVikasAaghadi